|| श्री स्वामी समर्थ ||
माझ्या पुढे मागे सगळीकडे उभा तूच स्वामीराया |
किती काळजी वाहशील ,सर्वच तुझ्या ह्या लीलया |
आज सकाळी मी दादरला एका महत्वाच्या कामासाठी जाणार होते. चार दिवसापूर्वीच आज जायचे हे पक्के झाले होते आणि त्यासाठी माझी तयारी चालू होती. गाडी हायवे वरून जाणार होती आणि तशीच मी दुपारपर्यंत परतही येणार होते. काल रात्रीपासून पावसाने जोर धरला होता. आज चंद्राचे श्रवण नक्षत्र होते त्यात काळ पौर्णिमाही होती. रात्रभर पाऊस खूप झाला होता.
पहाटे ३ वाजल्यापासून मी जागीच होते. आज पाऊस कोसळतोय आणि तो जाण्याचे नाव घेणार नाही हे जाणले आणि आपल्याला कदाचित जाता येणार नाही म्हणून मनात खट्टू झाले. सगळा योग जुळून आला होता पण म्हणतात ना स्वामींच्या इच्छे शिवाय झाडाचे पान सुद्धा हलायचे नाही .
मनात जायचे हे इतके ठाम होते कि माझ्या जाण्याला ह्या पावसाने लावलेली नकारघंटा मला सहन होत नव्हती. मन चलबिचल होत होते आणि सगळा मूड गेलाच होता. सगळा स्वयंपाक केला आणि पुन्हा बाहेर पहिले तर पाऊस जरा कमी झाला होता . मनात म्हंटले चला आता काही वेळाने पाणी ओसरल्यावर निघूया .
आमच्या घराजवळचा परिसर जलमय झाला होता. तेव्हड्यात विचार आला TV लावून पाहूया म्हणजे बाहेर काय स्थिती आहे ते समजेल. TV लावला आणि कांदिवलीला दरड कोसळल्याची बातमी आली. माझ्या हृदयात धस्स झाले. माझी गाडी तिथूनच जाणार होतो . सगळे अवसान गळून पडले , हातपाय कापू लागले आणि डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. आपले जाणे का रहित झाले हे आता मनोमन मला समजले आणि स्वामींच्या समोर डोके ठेवून नतमस्तक झाले.
स्वामी हे त्रिकालज्ञानी आहेत. आपल्याला दोन क्षणांनी काय होणार हेही माहित नसते पण ते सर्व जाणतात आणि आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी डोळ्यात तेल घालून अखंड पाठीशी असतात.
तारक मंत्रातील ओळी आठवल्या “ कितीदा दिला बोल त्यांनीच हात , नको डगमगू स्वामी देतील साथ ”. डोळ्यातून अश्रू थांबेनात इतकी सद्गदित झाले. सर्व काही शब्दांच्या पलीकडे गेले होते .खरच हे सर्व लिहितानाही माझे हात कापत आहेत . नको तो प्रसंग ओढवला असता पण स्वामिनी तारले. महाराजांच्या कडे पहिले तेव्हा जाणवले ,फोटोतून महाराज प्रेमाने सांगत होते “आजचा दिवस आपला नव्हता जणू ”. देवासमोर साखर ठेवली. तुम्ही म्हणाल ह्यात काय ? हा निव्वळ योगायोग. माझ्यासाठी आज जीवावर बेतणार होते कदाचित ,पण मला
घरातच थांबून ठेवण्याची जबाबदारी स्वामिनी खुबीने निभावली हे मी अंतर्मनाने जाणले . आयुष्यात आजवर त्यांनीच सांभाळले आहे आणि पुढेही तेच सांभाळतील. आपण राहिलो तर सर्व आहे नाही का?
असाच राहूदे माझ्यावर तुझा हस्तक |
तुझ्या समोर प्रत्येक क्षणी मी नतमस्तक ||
अस्मिता
Antarnad18@gmail.com
#antarnad # spirituality #shri swami samarth # surrender #trust #spiritual path #faith
#अंतर्नाद # प्रचीती # स्वामी समर्थ #गुरु माऊली # नतमस्तक #भक्ती #त्रिकालज्ञानी #अध्यात्म #शरणागत
Jai jai Swami Samarth 🌹🙏
ReplyDeleteश्री स्वामी समर्थ
ReplyDeleteShri Swami Samarth
ReplyDeleteप्रचितिविणे बोलू नये म्हणतात, आणि आपणास आलेली प्रचिती अत्यंत गदगद वाटणारी आहे. ही प्रचिती आपलं अंतर्मन जेवढं जाणून आहे तेवढी कुणालाही नसेल परंतू आम्हाला आपल्या प्रचितीतूनही स्वामीभक्ती व स्वामींचा अनन्यशरणभाव दिसून आला. खरंच आहे ,आपण प्रचितीच्या त्या दिव्य अनूभुतीने बोलला आहात. ही स्वामीभक्ती अशीच अखंड राहो.. 🙏🙏🚩
ReplyDelete