|| श्री स्वामी समर्थ ||
आज " अंतर्नाद " ह्या माझ्या ब्लॉग वरती १०० लेख लिहून पूर्ण झाले. मला तर हे सगळे स्वप्नवतच वाटत आहे. लहानपणापासून मला लेखनाची आवड होती आणि ब्लॉग च्या माध्यमातून ती पूर्ण झाली.
माणसाने नेहमी आपल्याला काय वाटते ते मोकळेपणाने सांगावे किंवा लिहावे. आपल्या भावना मग त्या कुणाहीविषयी असोत मोकळेपणाने बोलाव्यात . मन शांत राहते .पाणी हे नेहमी वाहते राहिले पाहिजे .
मी ब्लॉग सुरु केला आणि त्यानिम्मित्ताने मी व्यक्त होवू लागले. रोज नवनवीन विषय सूचू लागले आणि लिखाणात मी रमू लागले.
माझ्या ब्लोगवरील संपूर्ण लिखाणाचे श्रेय अर्थातच तुम्हा वाचकांना .प्रत्येक लेखा नंतर येणारे फोन, मेसेज ह्यामधून मला सतत प्रेरणा मिळाली . अनेकांनी विषयसुद्धा सुचवले . आपले छंद जोपासणे, आपल्या आवडत्या क्षेत्रात रमणे किती जणांना जमते ,म्हणूनच मी स्वतःला भाग्यवान समजते . मला आवडणाऱ्या लिखाणाच्या क्षेत्रात मला ह्या ब्लॉग च्या माध्यमातून वाव मिळाला हे माझे खरच सौभाग्य आहे.
आज माझे १०० लेख लिहून पूर्ण झाले. आपली कलाच आपल्याला आयुष्य कसे जगवायचे ते शिकवते . मला वाचकांचे अभिप्राय खरच समृद्ध करत आहेत ,प्रोत्चाहन देत आहेत ह्याबद्दल मी आपल्या सर्वांची ऋणी आहे .
स्वतःसाठी तर सगळेच जगतात पण इतरांसाठी जगणे ह्यात किती आनंद आहे तो मी ह्या लिखाणाच्या माध्यमातून अनुभवत आहे.
वाचकांचे अभिप्राय , सूचना हा ह्या ब्लॉग चा कणाच आहे म्हंटले तर वावगे ठरू नये आणि म्हणूनच आपल्या सर्व वाचकांचे मनापासून शतशः आभार . असेच माझ्या आणि " अंतर्नाद " सोबत सदैव उभे राहा कारण आपले अभिप्राय आणि मार्गदर्शन माझ्यासाठी फार मोलाचे आहेत ,त्यावरच माझी पुढील वाटचाल असणार आहे.
पुन्हा एकदा मनापासून आभार .
अस्मिता
#antarnad #100 articles #reviews #instructions #writing #express #thoughts
#अंतर्नाद # १०० लेख #अभिप्राय #सूचना #मार्गदर्शन #लेखन # व्यक्त #अव्यक्त #वाचक वर्ग
अरे व्वा!!! खूप छान!!! तुमच्या या ब्लॉगवरचे सर्वच लेख खूप सुंदर,उपयुक्त आणि प्रेरणादायी आहेत यात तिळमात्रही शंका नाही.असेच वेगवेगळ्या विषयांवर सर्वांना उपयुक्त असे हजारो लेख तुमच्या लेखणीतून लिहिल्या जावोत हीच ईश्वराच्या चरणी प्रार्थना����...... अभिनंदन������
ReplyDelete