Sunday, 12 July 2020

अभिप्राय

|| श्री स्वामी समर्थ ||






आदरणीय अस्मिता जी, 

सप्रेम नमस्कार !

 ▪️आपल्या ब्लॉगवरील, काही लेख वाचलेत. फेसबूक वरील आपल्या लेखातून,  आपण जेवढ्या कुशलतेने सामाजिक विषय हाताळता आहात,  तेवढ्याच कुशलतेने,  आपणास अध्यात्मिक विषयही हाताळता येतो,  याची प्रचिती,  आपल्याला लेखनावरून आली .
 ▪️अध्यात्मात आहे रुची असणे,  हाही प्राक्तनाचा एक भाग आहे,  असे मी मानतो. प्रत्येकासच ते प्राप्त होईल असे  नाही. 
 ▪️गुरु महात्म्याचा महिमा,  व आपली नितांत  प्रगाढ  श्रद्धा,  प्रत्येक लेखातून व्यक्त होत आहे. 
▪️ वेलीला जसा वृक्षाचा आधार असतो,  किंबहुना, वृक्षाच्या  आधाराशिवाय वेल स्वतःचा,  सहजरित्या विस्तार करूच  शकत नाही, तद्वतच, गुरुश्रद्धा ही मानवी जीवनातील आधार होय,  असे म्हटल्यास वावगे होणार नाही. 
▪️ श्रद्धेतही, निरामय आनंद असतो. जसजशी,  या विषयात,  तन्मयता वाढत जाते,  तसतशी, या आनंदाची अनुभूती ही वाढत जाते. 
▪️ आपल्याकडून, अशीच, गुरु चरणाची अखंडित, सेवा घडो,  ही ईश्वरचरणी प्रार्थना. 
▪️ पुढील वाटचालीस,  आपणास,  सहर्ष शुभेच्छा. 

पुंडलिक दाते, अकोला.

 ज्योतिष अभ्यासक.