|| श्री स्वामी समर्थ ||
प्रत्येक क्षेत्राचे स्थानमहत्व आहेच आहे त्याबद्दल दुमत नाही पण म्हणून तिथे जायला मिळाले नाही म्हणून " त्यांचे बोलावणे आल्याशिवाय जाता येत नाही ..." हे असे बोलणे आणि इतरांच्याही गळी उतरवणे आता पुरे असे वाटते... महाराज इथेच आहेत कि आपल्यासाबोत ... आत्ता मी काय लिहितेय ते आपल्या सर्वांच्या आधी तेच वाचत आहेत ...स्वामिनी सांगितलेय " शेत पिकवून खा ,," म्हणजेच काम कष्ट करा त्याला पर्याय नाही....अश्यांच्याच मागे मी उभा राहीन ....त्यामुळे जायला नाही मिळाले तर इथे आपल्या कामातच परमेश्वराला पहिले पाहिजे..
जे जे होते आणि होणार आहे ते त्यांच्या इच्छेने ह्यावर विश्वास लग्गेच नाही बसत पण कालांतराने महाराज अश्या काही प्रचीती अनिभव देतात कि बस....सर्व प्रश्नांची उत्तरे आपली आपल्यालाच मिळू लागतात ...सारखे काहीतरी मिळवणे आणि मागत राहणे हे कमी होत जाते आणि आता काहीच नको असे वाटते ...निदान मला तरी हे अनुभव आलेत ....राग ,लोभ ,जिभेचे चोचले सर्व सर्व अंतापर्यंत राहणारच पण त्याच्या मर्यादा आपण हळूहळू ओळखायला शिकतोच आणि म्हणूनच शेवटी मागण्याचे प्रमाण कमी होवू लागते ...इथे सर्वांचेच हे अनुभव असतील...कमी अधिक प्रमाणात ...
सर्वश्रेष्ठ मानसपूजेत महाराज प्रत्यक्ष दर्शन देतातच हा माझा विश्वास आणि स्वानुभव हि ...पण हे अनुभव आपल्याजवळच ठेवावेत कारण सांगून आपल्यातील अहंकार जोपासला जातो हि भीती असते कारण आपण शेवटी सामान्य माणसे..जरा कुणी हवा दिली कि आपला विठोबा घाटोळ झालाच म्हणून समजा....पण महाराजांवरचे भक्तांचे प्रेम उदंड न संपणारे आहे...
माझ्या ओळखीचे एक गृहस्त आहेत ...फार वर्षांचा सुखाचा संसार झाला आणि पत्नी वृद्धापकाळाने निवर्तल्या महाराजांवर संपूर्ण श्रद्धा तरी त्यांना का नेले म्हणून ते इतके नाराज झाले कि विचारू नका . त्यांनतर त्यांनी कधीच पोथी वाचली नाही पण रोज नमस्कार मात्र करतात पोथीला ...हे असे आहे ...लिहिण्यासारखे बरेच आहे ....आज इथेच पूर्णविराम देते.
अस्मिता