|| श्री स्वामी समर्थ ||
आपण सर्वच उठसुठ शानिमहाराजाना वेठीला धरतो ...साडेसाती आली आणि त्यात जरा वाईट झाले कि लग्गेच साडेसातीवर खापर आणि चांगले झाले कि श्रेय स्वतःला...असे नसते ..साडेसातीवर शनी वरती प्रश्नांची सरबत्ती असते ,अनेक लेख ह्यावर येतात अनेक प्रश्न विचारले जातात पण सर्व निष्फळ जोवर आपण आपले स्वतःचे कर्म तपासून पाहत नाही ...शनी हा न्यायी ग्रह आहे तो उगीच कुणालाही त्रास देत नाही आणि शिक्षाही ठोठावत नाही .तुमचे कर्म उत्तम असेल तर तो कश्याला तुम्हाला त्रास देईल.
स्वामी समर्थांचे पट्टशिष्य आनंदनाथ महाराजांच्या स्तोत्रात त्यांनी लिहिले आहे कि " कायिक वाचिक आणि मानसिक " सर्व पापे झाली जी अनेक ती माफ कर गुरुराया .म्हणजेच कायेने वाचेने आणि अगदी मनानेही मी कुणाचे वाईट चिंतले असेल तर ते मला माफ कर ...इतके सत्कृत्य आपल्या हातून चांगले झाले तर साडेसाती हे आपल्याला वरदान ठरेल ह्यात शंकाच नाही . माझी रास हि आणि माझा हा ग्रह इथे आहे आणि तिथे आहे हे बंद करा. प्रश्न थांबवा आणि उपासना सुरु करा .
साडेसातीत तसेच राहू दशेत माणसाने समाजत जास्ती मिसळू नये . कमीतकमी बोलावे म्हणजेच कमी बोलले कि प्रश्न आणि संकटे निर्माण होणार नाहीत .जास्तीत जास्त जप करावा.. रोज स्वतःचे सिंहावलोकन करावे रोज रात्री झोपताना जे जे काही दिवसभरात झाले ते सद्गुरुचरणी ठेवावे म्हणे सकाळी उठाल तेव्हा तुमच्याकडे काहीच राहणार नाही मग अहंकारही येणार नाही कारण सर्व तुम्ही देवालाच देवून टाकले मग अहंकार कसला ? रोज नवीन अध्याय सुरु करा बघा आयुष्यातील वाईट दिवसही चुटकिसरशी निघून जातील....करून पहा...
माझ्या राशीला साडेसाती कितवर आहे ? हे आणि असे अनेक प्रश्न नकोत ... काहीच कुणालाच विचारू नका हे माझे वैयक्तिक मत आहे...परमेश्वराने तुम्हाला रामबाण उपाय दिलाय सर्व दुक्खावर...नामस्मरण तो सोडून आपली जगभ्रमंती चालू असते ... नाम घ्यावयास लागा बघ काय चमत्कार होतो आयुष्यात ...
सध्या धनु , मकर आणि कुंभ ह्या राशींना साडेसाती चालू आहे .धनूची शेवटची अडीचकी मकर राशीची मधली आणि कुंभेची पहिली चालू आ
हे. शनी महाराज अत्यंत न्यायी ग्रह आहे पण मिजासखोर लोकांना ते अजिबातच सोडत नाहीत . साडेसाती आयुष्यातील अत्यंत उत्तम काळ असतो ज्यात अनेक भौतिक सुखे प्राप्त होतात जसे अनेकांची घरे होतात ,विवाह संपन्न होतात ,परदेशगमन ई तसेच आपण स्वतःही अंतर्मुख होतो .
अनेक मनासारख्या गोष्टी होतात पण ज्यांच्यासाठी जे विनयाने ,नम्रतेने वागतील. ...शनिचा जप तुम्हाला संयम शिकवतो ,पैशाने सर्व सुखे मिळतील पण माणसे पैशाने विकत घेता येत नाहीत ती आपल्या स्वभावाने जोडावीच लागतात हि शिकवण मिळते . शनी सिंहावलोकन करायला शिकवतो ,आपल्या चुका आपल्यालाच उमजतात मग.
पण काही जणांना आपल्या कामासाठी माणसे वापरून फेकून देण्याची सवय असते ती साडेसातीचे फटके खावूनही जात नाही . देवळात जा नाहीतर जप करा त्यांच्या स्वभावात काहीही फरक पडत नाही ..आणि मग शनी देवांच्या शिक्षेस ते पात्र ठरतात.
भल्याभल्यांची झोप उडवणारे शनी महाराज इतके फटके मारून सुद्धा काडीचाही माज न उतरलेले लोक पहिले कि आठवतात ह्या ओळी ...चढता सुरज धीरे धीरे ढलता है ढल जायेगा...