|| श्री स्वामी समर्थ ||
आयुष्यात मैत्री टिकणे ,चांगली माणसे भेटणे ह्याचेही काहीतरी ग्रहमान असेलच कि . खरच अशी कुठली ग्रहस्थिती असेल कि आयुष्यात माणसेच टिकत नाहीत ?
तसे पाहता मैत्री हि दोन्ही कडून तितक्याच ओढीने ,मनापासून असेल तर ती मैत्री ..ओढून ताणून एकतर्फी मैत्री खरच मैत्री असते का? शाळेत बेरीज वजाबाकी शिकवलेली आहेच आपल्याला , त्याचा प्रत्यक्ष आयुष्यात उपयोग करता आला पाहिजे...सगळ्यांनाच सगळे आवडले पाहिजेत असे काही नाही सारख्याशी मिळे सारखा.. ह्या युक्तीला धरून आपल्या स्वभावासारखी ,माणसे आपल्याला भेटतच जातातच कि..आणि पुढेही भेटणार आहेत...तेव्हा आपल्याला टाळणार्या व्यक्तींविषयी दुक्ख न करता ..आलात तर माझ्यासोबत नाहीतर तुम्हाला सोडून मी पुढे जाणार ..असा बाणा अंगी बाळगला पाहिजे ..उगीच हा बोलत नाही ती फोन करत नाही ..हवीत कश्याला हि विकतची दुखणी ..ते आपल्याशिवाय जगू शकतात तर आपणही त्यांच्याशिवाय जगू शकतो ...आणि तेही उत्तम.....अश्यांना आयुष्यातून आणि मनातूनही कायमचा वजा करा आणि मस्त आपल्याच धुंदीत तब्येतीत जगा ...मनात झालेली रिती जागा घ्यायला काही, अगदी तुमची असणारी माणसे वाट पाहत आहेत ...त्यांचे स्वागत करा आणि आनंदाने आयुष्य पुढे नेत राहा....
शेवटी इथेच सर्व सोडून जायचं...एकलाची चाले मी.....
अस्मिता
खालील लिंक वरती अभिप्राय नोंदवा
antarnad18@gmail.com
#antarnad #friendship #bonding #people #stars #relations #love #humanity #gratitude
#अंतर्नाद #मैत्री #ग्रहयोग #नाती #माणुसकी #कृतज्ञता
No comments:
Post a Comment