||श्री स्वामी समर्थ ||
नवग्रहांतील महत्वाचा ग्रह “ रवी ”. रवी तारा असला तरी त्याला ज्योतिष शास्त्रात ग्रह म्हणूनच संबोधले आहे. हिंदू संस्कृतीमध्ये रविला म्हणजेच सूर्याला अनन्यसाधारण महत्व आहे. पत्रिकेत रवी शुभस्थितीत असेल तर सरकारी नोकरीचे योग येतात तसेच राजमान्यता प्राप्त होते. राजकारणातील व्यक्तींच्या पत्रिकेत प्रामुख्याने रवी सुस्थितीत आढळतो . स्त्रियांच्या पत्रिकेत शुक्र , मंगळासोबत रवी चांगला असेल तर पती चांगला मिळून वैवाहिक सौख्य चांगले मिळते .रवी हा आत्मा आहे तसेच त्याला पित्याचाही कारक मानला आहे.
आपल्या शरीरातील आत्मा जितका महत्वाचा तितकाच रवी आपल्या आयुष्यातहि महत्वाचा. शरीरातील प्रतिकार शक्ती तसेच आपल्या शरीराचे तेज रविवरून ज्ञात होते .रवी एका राशीत अंदाजे महिनाभर भ्रमण असतो.
आपली संपूर्ण जीवसृष्टी रवीवर म्हणजेच सूर्यावर अवलंबून आहे. विचार करा एकदिवस सूर्य उगवलाच नाही तर काय होईल ? ह्यावरूनच सूर्याचे आपल्या जीवनातील अनन्यसाधारण महत्व समजते.
पूर्वीच्या काळी घरातील स्त्रिया सूर्योदयापूर्वी उठून सोवळ्याने सडासंमार्जन करत असत. दारात सुशोभित रांगोळी काढून तुळशीचे पूजन केले जात असे. घरातील पुरुषमंडळी आणि मुले सूर्यनमस्कार घालत असत.
सूर्योपासना करून आपण सामर्थ्यवान होवू शकतो. आपल्या पत्रिकेत रवी क्षीण असेल तर ह्या उपासनेने त्याचे बळ वाढू शकते .अर्थात ह्यात सातत्य हवे. रवी महादशा असेल त्यांनी तर हे अवश्य करावे.
सूर्याची १२ नावे घेऊन सूर्यनमस्कार घालून सूर्योपासना करता येते. सूर्यनमस्कार हे सर्वांगीण आसन आहे.
आजकाल सूर्यनमस्कार घालणाऱ्या लोकांचे समूह आढळतात जे नियमाने रोज सूर्यनमस्कार घालतात .
नियमितपणे गायत्री मंत्र म्हणणे हि सुद्धा एक साधनाच आहे. ह्यामळे शरीर निरोगी होऊन सुर्यासारखे तेज प्राप्त होते. तसेच सूर्याला जल (Arghya) देणे ही सुद्धा एक उपासना आहे. नित्याने केल्यास त्याचे असंख्य फायदे आहेत . सूर्यास जल दिल्याने आत्मविश्वास वाढतो , शरीर तेजपुंज होते.
सूर्य नारायणाला जल(Arghya) देतो तेंव्हा त्याची सप्तरंगीं किरणे आपल्या डोक्यापासून पायापर्यंत पडून सर्व अवयवाना प्रभावित करतात. दृष्टीदोष जाऊन निर्णयशक्ती, आत्मविश्वास तर वाढतो. शरीरातील पचनेन्द्रीये सुधारतात आणि जीवनशक्ती मिळून आरोग्याच्या तक्रारी दूर होतात .सूर्य किरणे शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवतात. अर्ध्य दिल्याने शरीरातील 7 चक्रे उत्तेजित होतात. बुद्धी कुशाग्र होऊन सकारात्मकता वाढते .चैतन्य लहरी शरीरात प्रवाहित होतात .
सूर्याला जल(Arghya) कसे द्यावे.
एक फुलपात्र किंवा तांब्याचे भांडे पाणी भरून घ्यावे . त्यात लाल फुल किंवा कुंकू घालावे.काहीच नसेल तर नुसते पाणी घ्यावे . सूर्याला जल देताना भांड्यातील पाण्याची धार आणि आपण ह्यातून आपल्याला सूर्यदर्शन होयील इतपत भांडे वरती घ्यावे आणि सूर्यास सूर्याचा मंत्र किंवा गायत्री मंत्र म्हणत अर्ध्य द्यावे म्हणजे आपण आणि सूर्य ह्यामध्ये बरोबर पाण्याची धार असली पाहिजे . सूर्यास जल(Arghya) सावकाश घालावे जेणेकरून १२ वेळा सूर्यमंत्र म्हंटला जायील. मनोभावे नमस्कार करावा. सूर्योपासना नक्कीच फलदायी आहे.
लहान मुलांना सूर्यनमस्कार,गायत्री मंत्र आणि सूर्यास जल देणे हे लहानपणापासूनच शिकवावे जेणेकरून त्यांचे आयुष्य अधिक सक्षम ,तेजोमय होयील आणि आत्मविश्वास वाढून बुद्धी तल्लख होयील. जीवनातील चढ उतारांवर ते डगमगणार नाहीत .काही मुले सारखी जरा ऋतू बदलला तरी आजार पडतात ,नाजूक प्रकृतीची असतात . अश्यांना निरोगी आयुष्य प्राप्त होण्यासाठी हि उपासना उत्तम आहे.
आपल्या आयुष्यातील अंधकार दूर करून आपले आयुष्य सतत प्रकाशमान करणारा हा तेजस्वी तारा म्हणजे सूर्य .चला तर मग सूर्योपासना करून आपण आपले जीवन अधिक तेजोमय , प्रकाशमय आणि उर्जामय करुया.
केल्याने होत आहे आधी केलेची पाहिजे ह्या उक्तीला धरून चला सुरु करुया “ सूर्योपासना ”.
अस्मिता
लेख आवडल्यास आपले अभिप्राय खालील लिंकवर किंवा कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा .
Antarnad18@gmail.com
#antarnad #sun #water #copper vessel #kunku #immunity #positive thinking #confidence #brillient
#अंतर्नाद #सूर्य #उपासना #अर्घ्य #तांब्याची भांडी #कुंकू #जीवनशक्ती #सकारात्मक #आत्मविश्वास #तेजोमय
खूप छान आणि सर्वांना उपयुक्त अशी सूर्य ग्रहाची माहिती
ReplyDeleteKhupach chan mahiti!!
ReplyDeleteKhup khup khup sundar😊
ReplyDelete🙏👩💻❤️
ReplyDelete