Thursday, 23 July 2020

अभिप्राय

||श्री स्वामी समर्थ ||





श्री . दिलीप तांबोळकर ,पुणे ह्यांचा "अनुबंध स्वयंपाकघराचे " ह्या लेखावरील अभिप्राय


खरं तर स्वयंपाक घरात घरातील गृहिणीची सत्ता आणि त्या अनुषंगाने तिच्या सत्तेत कुणी घूसखोरी केलेली तिला चालतही नाही आणि कुणी करु पण नये. कारण त्या ठिकाणी त्या गृहिणीचे मन, हितगूज तिचं विश्व दडलेलं असतं. आणि त्यासाठी ती तन मन लावून दिवसभर सगळ्यांच्या जेवणाच्या वेळा आणि मन सांभाळत असते अगदी न कुरकुरता. हे घरातील तमाम सभासदांना माहीत असते. सणासुदीला तर घरातील गृहिणीची खरंच लगभग असते. भल्या पहाटे उठून तयारीला सुरुवात होते. घरात होणारे धार्मिक सण आणि हे कुलाचार त्यातली भक्ती आणि ती सात्विकता त्या अन्नात उतरते हे ज्यांनी प्रत्यक्ष अनुभवलं आहे तेच ह्याचा आनंद जाणो,...

तसं बघितलं तर रोजचाच कुकर,तेच डाळ तांदूळ,आणि करणारे हात पण तेच पण चव परत रोज ठरवली तरी अशी होत नाही,...

*सात्विक मनाने केलेला स्वयंपाक किती माणसं आले तरी कमी पडत नाही*

आणि हे सगळे मी लहानपणापासून घरात बघत आलो आहे. सुरुवातीला आजी आणि आई.. नंतर आई आणि ताई.. ताई सासरी गेली कि आई आणि सौभाग्यावती.. आता तर आई नाही व सौ पण नाही.. पण बाहेरच अन्न आणून खाण्याच्याऐवजी जसा येईल तसा स्वयंपाक करुन त्या अन्नपूर्णेचा वास घरात टिकून राहण्यासाठी मी पण कंबर कसून तयार होऊ लागलो. नाॅन प्लेईंग कॅप्टन सारखा.. 



मी आपल्या अभिप्रायाबद्दल मनापासून आभार मानते.

अस्मिता

antarnad18@gmail.com



No comments:

Post a Comment