||श्री स्वामी समर्थ ||
अस्मिता मॅडम आपण पाठविलेला ध्यान साधना या वरल लेख अतिशय सुंदर आहे
सुहास पायगुडे
खूप छान माहिती मिळाली. आयुष्य सुंदर जगण्यासाठी लागणारी एक शिदोरीच मिळाली असे वाटते आहे. मनापासून धन्यवाद.
अभय कोल्हटकर
"श्रावण सोहळा" हा तुझा ब्लाॅग वाचला..
ह्या लेखात तू श्रावण महिन्यातील सर्व धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक सोहळ्यांचे खूप सुंदर व सर्व बारीक सारीक गोष्टींचे, संदर्भांचे वर्णन केले आहेस.. त्या वर्णनामुळे श्रावण महिन्यातील सर्व सण प्रत्यक्ष साजरे करत असल्याचा भास झाला.. तसेच माझं बालपण सुद्धा डोळ्यासमोर आले.. श्रावण महिन्यातील शनिवारी लहानपणी बटु म्हणून आमंत्रण असायचं ..त्या वेळी शनिवारी सकाळी स्नानापासून दुपारच्या पक्वान्नांवर ताव मारेपर्यंत सर्व प्रसंग आठवले.. तसेच श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी वाईच्या परिसरातील विविध महादेवाच्या मंदिरात पहाटे उठून जात असू तसेच सरत्या/शेवटच्या सोमवारी भरणारी जत्रा व त्या मध्ये लहानपणी केलेली धमाल पण आठवली.. माझ्या घरातील माझ्या आठवणीतील मंगळागौरीची पूजा पण आठवते...त्या निमित्ताने घरातील सवाष्ण स्रीयांची (आई, काकू, बहिणी) लगबग, धावपळ पण अनुभवायला मिळाली. खरंच श्रावण महिन्यातील या सर्व सणावारांने आपणामध्ये चैतन्य व उर्जा निर्माण होते व त्यावर आपण पुढील कार्यकाळ व्यतित करतो.. ह्या लेखासाठी तुझे आभार, अभिनंदन 💐 व धन्यवाद...
रघुनाथ पाटील
आपला लेख आवडला, मी हॅपी थॉट्स केले आहे, त्यामुळे आम्ही दररोज साधना करतो
हेमा गायकवाड
खुपच सुंदर आहे लेख.आपल्यामुळे इतकी सुंदर माहिती मिळाली.धन्यवाद .
श्रीकांत खाडिलकर
साधना का व कशी करावी----- पदमासनाचा अट्टाहास नसावा,ज्या आसनात सुख वाटेल तेच आसनात बसून साधना करणे जास्त योग्य वाटते,पातंजली ऋषींनी सुद्धा " स्थिरम सुखमासानं " असेच म्हटले आहे. आपल्याला प्रतिक्रिया अपेक्षित आहे म्हणुन मी माझे वैयक्तिक मत दिले आहे .
सुलभा पाटील
I always read your articles on the group n like them..but article about dhan sadhana.. really great n helpful to those who really wants to do sadhana. I always wanted to do dhan sadhana,but due my knee operation I am not able to fold my legs n also can't sit on the floor. You have given a very nice n correct way to do dhan sadhana.but I request you please guide me in my case..how to do dhan sadhana proper way..
अंजली आलेकर
अतिशय साध्या व सोप्या भाषेत ध्यान कसे करावे आणि त्याचे आपल्या धकाधकीच्या जीवनातले त्याचे महत्व स्पष्ट केले आहे. ध्यान म्हणजे काय , त्याचे फायदे काय , कसे करायचे, ह्यात एकेक स्टेप कसे पुढ जायचे हे अतिशय योग्य आणि सोप्या पद्धतीने सांगितलं आहे . लेखकाची वाचकाबरोबर कनेक्ट होण्याची शैली खूप छान आहे.
कविता नेहेते
Khup chan lihile aahe sadhna kashi karavi.maze man nehmich ashant aste, tya sathi me medha vatu ghete. Pan aata tumhi sopya ritine sangitaleli sadhna me karaycha praytna karnar. Khup Dhanyavad,
रेखा जोशी
प्रत्येकाने अनुकरण करावे असा बोधपूर्ण लेख. नियमित उपासना व साधनेने समस्या आपोआप सुटतात, मार्ग मिळतो हा माझा अनुभव.
अश्विनी लोणकर
खूप छान साधनेवर माहिती दिली मला साधना करायची आहे पण कशी करावी समजत नव्हते ,तुमचा पूर्ण लेख प्रेरणादायी आहे.अजून माहिती मिळाली तर खूप छान.
कृष्णा पाठक
"केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे"...क्या बात है!!!साधना कशी आणि का करावी? साधना केल्याने आपल्या अंतर्मनात कसे सकारात्मक बदल घडून येतात?आजच्या या धकाधकीच्या जीवनात साधना किती आवश्यक आहे? या लेखात आपण खूपच सुंदर आणि सोप्या शब्दात समजावून सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.अप्रतिम! अप्रतिम!! अप्रतिम!!!
No comments:
Post a Comment