||श्री स्वामी समर्थ ||
लहानपणीचा खाऊच्या डब्यातील सर्वश्रुत पदार्थ म्हणजे "पोळीचा लाडू ". रात्रीच्या शिळ्या पोळ्या उरल्या तर आई ती पोळी कुस्करून त्यात गुळ ,तूप घालून मस्त पोळीचे लाडू करत असे . पंचपक्वान्नापेक्षाही जास्ती चव असे त्याला.
पूर्वीचा काळच वेगळा होता .शाळेतून आल्यावर खूप भूक लागलेली असायची आणि मग तेव्हा हा पोळीचा लाडू समोर आला कि आम्ही भावंड तो क्षणात फस्त करत असू. हे लाडू पौष्टिक तर असतातच पण अन्न फेकून दिले जात नाही हे सर्वात महत्वाचे.
आजकाल सारखे तेव्हा Maggi, सामोसे ,कुरकुरे , वेफर्स ,असे Pack Food अजिबात नव्हते .बाहेर जावून किंवा बाहेरील जिन्नस विकत आणून खाणे असे प्रकार तेव्हा प्रचलित नव्हते . जे काय खायचे ते घरी करून खायचे असा शिरस्ता असायचा .
आज कालच्या पोळ्या उरल्या आणि पोळीचा लाडू केला तेव्हा मन भूतकाळात फेरफटका मारून आले. लहानपणच्या सगळ्या आठवणी डोळ्यासमोरून तरळून गेल्या.
असे हे लहान क्षणच आपल्या बालपणच्या आठवणींचे साक्षीदार करतात . ह्या क्षणांनी आपल्याला समृद्ध केले असते. ह्या लाडूत गुळापेक्षाही आईच्या हातचा गोडवा अधिक असायचा आणि म्हणूनच हे "पोळीचे लाडू " अगदी अजरामर झाले. आजच्या इंटरनेट च्या युगातील मुलांना कदाचित हे माहित सुद्धा नसतील ,पण असे हे घरगुती पदार्थ खातखातच आम्ही लहानाचे मोठे झालो .
फास्टफूड च्या modern युगात "पोळीचे लाडू ,फोडणीची पोळी " ह्या संज्ञा विरून गेल्या आहेत .
पण अधून मधून असे पदार्थ करून, ह्या आठवणीना उजाळा देऊन, त्या जतन करून ठेवल्या पाहिजेत . काय वाटते ?
अस्मिता
लेख आवडल्यास खालील लिंक वरती अभिप्राय जरूर कळवा .
antarnad18@gmail.com
#antarnad #laddu #wheat grain #tasty food #healthy laddu #sweet #diet #Jaggery #receipe
#अंतर्नाद #पोळीचा लाडू #सणवार #मिष्टान्न # आई # चवदार #साजूक तूप #गुळाचा पदार्थ # आधुनिक काळ #शिळी पोळी #आहार #आरोग्य #गुळाची स्वादिष्ट पाककृती
फारच सुंदर! बालपणाची आठवण आली. या परंपरा जतन कराव्या तर हल्लीची पिढी यापासून दूर जात आहे. या पदार्थांची आवड आणि चव आपण पण पुढील पिढीसाठी टिकवली नाही हे पण सत्य आहे.
ReplyDeleteMast, it's true 👍
ReplyDeleteआम्हीपण खूप आवडीने खायचो. आज पुन्हा आठवण झाली. आपल्या संस्कृतीने अन्नाला केवळ उदरभरणाचं साधन न मानता यज्ञकर्माची उपमा अन्नाला देऊन भारतीय अन्न संस्कृतीचा सन्मान राखला आहे.
ReplyDeleteआम्हीपण खूप आवडीने खायचो. आज पुन्हा आठवण झाली. आपल्या संस्कृतीने अन्नाला केवळ उदरभरणाचं साधन न मानता यज्ञकर्माची उपमा अन्नाला देऊन भारतीय अन्न संस्कृतीचा सन्मान राखला आहे.
ReplyDeleteअगदी खरंय...हे पदार्थ आपल्यासाठी पंचपक्वांना सारखेच होते... आणि आम्ही नशिबवान की आजही आमच्या घरातील तरूण पिढी पोळीचा लाडू आणि फोडणीची पोळी खूप आवडीने खातात... कदाचित हा वारसा पिढीजात पुढे पाठवला जाईल... आणि आम्ही जुन्या चवीचे नेहमीच साक्षीदार असू....या सुंदर आठवणींसाठी खूप खूप खूप धन्यवाद अस्मिता
ReplyDelete