Friday, 24 July 2020

गळा गाता झाला ...

||श्री स्वामी समर्थ ||



एक अविस्मरणीय अनुभव आज कथन करावासा वाटत आहे. २०१७ ला हिंदुजा मध्ये माझे Thyaroid चे ऑपरेशन झाले. आदल्या दिवशी अनेक फोर्म वरती सह्या करून घेतल्या. डॉक्टर उत्तम होते पण तरीही त्यांनी प्राथमिक सूचना म्हणून खुलासा केला कि तुमचा आवाज बदलू शकतो कारण तिथेच स्वरकोश, श्वसननलिका आहे. एक क्षणभर मनात विचार आला आपला आवाजच गेला तर ? काहीही होवू शकते.

लगेच जागेपणीच स्वप्नरंजन चालू झाले. मी वाण्याच्या दुकानात गेली आहे पण बोलता येत नाही म्हणून पाटीवर लिहून देते आहे “ एक किलो तुरडाळ ,तांदूळ द्या “.डोळ्यातून घळाघळा पाणी येवू लागले. आता पुढे काय वाढून ठेवले आहे. मनातून खूप घाबरले होते .रात्रभर तळमळत होते अर्थात सकाळी ऑपरेशन असल्यामुळे झोप न लागणे हे नैसर्गिकच होते. सकाळ झाली आणि का कोण जाणे फक्त एक क्षणभर स्वामिना डोळ्यासमोर आणले आणि होती नव्हती ती सगळी भीती पळून गेली. तारक मंत्रातील “ कितीदा दिला बोल त्यांनीच हात ”..आठवले आणि एकदम सगळी कात टाकल्यासारखी उठून बसले . 

स्वामी इतके मला सांभाळत असतानाही माझ्या मनात इतके चुकीचे विचार आलेच कसे ? माझी मलाच लाज वाटली . महाराजांना हात जोडले आणि मनापासून माफी मागितली ,त्यांच्या असण्यावरच मी शंका घेतली होती. त्यांनी मला माफ केलेच असणार कारण मी सामान्य माणूस आहे पण सर्व निष्ठा त्यांच्या चरणाशी अर्पण केल्या आहेत हे ते जाणतात . ऑपरेशन ला जायच्या आधी फक्त महाराजांना सांगितले..” माझा आवाज परत येऊदे. माझ्या मुखात फक्त स्वामी नाम असेल तेही अखेरच्या श्वासापर्यंत . ऑपरेशन अत्यंत यशस्वी झाले. मुलगा म्हणाला “अग तुझे ऑपरेशन करायला प्रत्यक्ष स्वामीच आले होते ,तुला कसे काय होवू देतील ते ?”. कितीही निरागस भक्ती हि त्याची जी मला जमली नाही .

काही दिवस माझा आवाज बदलला होता, खूप घोगरा झाला होता ,Speech Thearapy घ्या असे डॉक्टरांनी सुचवले होते पण त्याची कश्याचीही गरज लागली नाही . हॉस्पिटल मधून ३ र्या दिवशी घरी येवून सगळा स्वयपाक पण केला आणि पुन्हा एकदा माझ्या छोट्याश्या विश्वात रमून गेले.

आज माझा आवाज पुन्हा पहिल्यासारखा झाला आहे. आता मी तारक मंत्र ,गाणी सर्व काही पाहिल्यासारखे म्हणू शकते . कधीकधी वाटते स्वामी आपल्या इतके जवळ असूनही आपल्याला ते उमगत नाहीत खरच कुठे कमी पडतो आपण ?

पण माझी गाणे म्हणायची म्हणजे गुणगुणायची आवड महाराजांनी न मागताही पूर्ण केली आणि गळा गाता झाला.

अस्मिता

लेख आवडल्यास खालील लिंक वरती Click करून अभिप्राय जरूर द्या.


antarnad18@gmail.com


#antarnad # sound #voice #Thyaroid #operation # positivity #Sadguru #Faith #Trust #Speach Thearapy #Life #lifetime experience

#अंतर्नाद # आवाज #थायरोईड #ऑपरेशन # सकारात्मक #सद्गुरू स्वामी समर्थ # विश्वास #संभाषण कला #आयुष्य #गाणी #आयुष्यातील महत्वाचा क्षण 

8 comments:

  1. खरंच आहे ज्यांच्या पाठिशी स्वामी आहेत त्यांना कशाचीच भीती बाळगण्याची गरज नाही.स्वामी नामातच प्रचंड शक्ती आहे...श्री स्वामी समर्थ🙏🌹🙏

    ReplyDelete
  2. आपली भक्ती हीच खरी तारक आहे...
    डोळे मिटूनी क्षणभर
    आठवावे गुरूवर...
    तेची येतील धावत
    करतील भयमुक्त..
    असा हा गुरू नामाचा महिमा आहे ग... गुरू तारून नेतातच. खूप सुंदर अनुभव आहे हा. अस्मिता , तुला स्वामींचा वरदहस्त आहे...

    ReplyDelete
  3. स्वामीभक्तीचा आपला हा अनुपम अनुभव आपली दृढता दाखवून देतो.प्रत्येक स्वामीभक्ताला आपल्या महाराजांबद्दल इतकी दृढ भक्ती यायला हवी. भक्ती ही जेव्हा निरपेक्ष बणते तेव्हा चमत्कार कधी घडतात ते कळत नाही. आपल्या अनेक लेखमालेत स्वामीभक्तीचं तेज प्रसवताना दिसून येतं.
    मला आपल्या स्वामीभक्तीच्या दृढतेमुळे माझ्याही गुरूभक्तीला दृढता येते ही गुरूतत्व सगळीकडे एकच विराजमान आहे ह्याचं लक्षण नव्हे का..! धन्य....!

    ReplyDelete
  4. स्मिता24 July 2020 at 11:11

    छान सांगितली अनुभूती.
    श्री स्वामी समर्थ!

    ReplyDelete
  5. If possible, read my blog also. It's general and simple.
    www.anagha-happy.blogspot.com

    ReplyDelete
  6. श्री स्वामी समर्थ

    ReplyDelete